Pimpri News : अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांची तपासणी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2007 ते 2022 या काळात भाषा व धर्म यांच्या नावाखाली देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांची तपासणी झाल्यानंतर नावे व पत्यांसह यादी नागरिकांच्या माहितीसाठी शासनाने प्रसिद्ध करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

याबाबत शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

त्यात कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांना शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये शाळा नोंदणी न करण्याची मुभा आहे. हाच धागा पकडून शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांनी मागील काही वर्षात अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्था ही मान्यता मिळवली आहे.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अयोग्य पद्धतीने मान्यता देण्यात आली, असेल तर दोषी अधिका-यांवर कारवाई करावी. तसेच अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांनाही शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात यावा. 25 आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शाळेत प्रवेश देण्याची आदेश देण्याची विनंतीही त्यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.