Vadgaon News : शाळेची धोकादायक सीमाभिंत दुरूस्त करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची सीमाभिंत तिरकी झाली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भिंतीवरून काही विद्यार्थी येजा करत असतात. भिंत अचानक कोसळल्यास गंभीर प्रकार घडू शकतो, यामुळे ती भिंत तात्काळ दुरुत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन समाजिक कार्यकर्ते विजय कदम यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहे. न्यू इंग्लिश स्कूल मध्ये हजारो विद्यार्थी शिक्षणा करीता येतात. शारीरिक शिक्षण, दुपारची सुट्टी या दरम्यान विद्यार्थी मैदानात खेळत असतात. ही भिंत मैदानास लागून आहे. काही विद्यार्थी या भिंतीवर चढून भिंत ओलांडून जातात. धोकादायक झालेली भिंत शाळा चालू असताना कोसळल्यावर मैदानात खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर पडून मोठी जिवीत हनीही होण्याचा धोका आहे.

या बाबीकडे लक्ष वेधून सामाजिक कार्यकर्ते विजय कदम यांनी निवेदन दिले आहे. भिंत कोसळण्याची दाट शक्यता असल्याने यामुळे भविष्यात दुर्घटना होऊ नये यासाठी भिंत तात्काळ दुरूस्त करून घ्यावी, अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.