Chinchwad news: कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठानच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचा-यांना मिठाई वाटप करण्यात आली. गेली 22 वर्ष हा उपक्रम सुरु आहे.

यावर्षी कोरोनाचे संकट असताना पूर्णानगर, शिवतेजनगर प्रभागाचे पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचे सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्ते सफाई केली आहे. खरे कोरोना योद्धे हे लोक आहेत याची सामाजिक दखल घेत सालाबादप्रमाणे कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य विभागाचे सुपरवाजर भारत शेंडगे आणि त्यांची टीम यांना माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, विकास गर्ग, मंगेश पाटील, अर्चना तौडकर, अंजली देव, अक्षदा देशपांडे यांच्या हस्ते आरोग्य विभागातील कर्मचा-यांना मिठाई वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.