CM Eknath Shinde ill : तब्येत बिघडल्याने मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यामुळे मुख्यमंत्र्यांना थकवा (CM Eknath Shinde ill) आल्याची माहिती आहे. डॉक्टरांकडून शिंदे यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.त्यांनीही सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले आहेत.

 

फडणवीस पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक चिन्हाबाबत कुठलाही निर्णय न घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिल्याने भाजप सावध पावलं टाकण्याच्या पवित्र्यात असल्याचं चित्र आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी 20 जूनला बंड पुकारल्यानंतर सुरत गोवा असे त्यांचे मार्गक्रमण सुरु होते. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी भाजपसोबत सत्तास्थापन (CM Eknath Shinde ill) केली आणि शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले.30 जूनला मुंबईत येऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे,सभा, पत्रकार परिषदा असे अतिव्यस्त वेळापत्रक बघायला मिळत आहे.

 

 

गेला महिनाभरात रात्री अपरात्री असोत,एक दोन दिवसांचे असोत,तर कधी उघड आणि कधी गुप्त असे झालेले दिल्लीचे दौरे असोत, पंढरपूर वारी, महाराष्ट्र दौरा यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ताण आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांनी एक दिवस सक्तीचा आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.