Rain In Maharashtra : राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार

एमपीसी न्यूज – राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून पुन्हा काही ठिकाणी पाऊस सक्रीय झाला आहे. आता हा पाऊस पुढील काही दिवसांपासून सक्रीय (Rain In Maharashtra) होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

वातावरणातील बदलांमुळे पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पाऊस होणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या 6 व 7 रोजी कोकण, गोव्यासह (Rain In Maharashtra)  काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

 

या भागात पावसाची शक्यता

राज्यात चार ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा,कोल्हापूर, पाच ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. सहा ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे तर सात रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड पुणे, नाशिक या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.