Spartan Monsoon League : सॅफरॉन क्रिकेट क्लब, रायझिंग बॉईज संघांचा सलग दुसरा विजय; कल्याण क्रिकेट क्लबची विजयाची हॅट्रीक

एमपीसी न्यूज : स्पार्टन क्रिकेट क्लबतर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत सॅफरॉन क्रिकेट क्लब आणि रायझिंग बॉईज या संघांनी सलग दुसरा तर, कल्याण क्रिकेट क्लब संघाने विजयाची हॅट्रीक नोंदवली.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत शुभम खटाळे याच्या खेळीमुळे सॅफरॉन क्रिकेट क्लब संघाने इलेव्हन स्टॅलियन क्लबचा 8 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना इलेव्हन स्टॅलियन क्लबने 142 धावा जमविल्या. यामध्ये श्रेयस राजेंद्र (28 धावा), आदित्य चौहान (24 धावा) आणि अंकुर सिंग (27 धावा) यांनी धावांचे योगदान दिले. सॅफरॉन क्रिकेट क्लबने हे आव्हान 11.1 षटकात व 2 गडी गमावूण पूर्ण केले. शुभम खटाळे (नाबाद 43 धावा) आणि हृषीकेश मत्स्ये (44 धावा) आणि नचिकेत कुलकर्णी (24 धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय सोपा केला.

 

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ

 

 

केतन परमार याच्या अर्धशतकी खेळीमुळे कल्याण क्रिकेट क्लब संघाने पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबचा एक गडी राखून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला.पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करून 138 धावा जमविल्या.कल्याण क्रिकेट क्लबने हे आव्हान 18.3 षटकात पूर्ण केले. केतन परमार याने 56 धावा करून डावाला आकार दिला. रोहन चंकेश्‍वरा (27 धावा) याने योग्य साथ देत संघाचा विजय साकार केला.

तुशार सिन्हा याच्या भेदक गोलंदाजीमुळे रायझिंग बॉईज क्लबने स्टॅलियन्स् क्रिकेट क्लबचा 7 गडी राखून पराभव केला. स्टॅलियन्स् पहिल्यांदा फलंदाजी करताना 91 धावा जमविल्या. तुषार सिन्हा याने 8 धावात 3 गडी बाद केले. रायझिंग बॉईजने हे आव्हान 12 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले व सलग दुसरा विजय नोंदविला.

 

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

इलेव्हन स्टॅलियन क्लब :  20 षटकात 7 गडी बाद 142 धावा (श्रेयस राजेंद्र 28, आदित्य चौहान 24, अंकुर सिंग 27, रोहन देशमुख 2-20) पराभूत वि. सॅफरॉन क्रिकेट क्लबः 11.1 षटकात 2 गडी बाद 143 धावा (शुभम खटाळे नाबाद 43, हृषीकेश मत्स्ये 44, नचिकेत कुलकर्णी 24); सामनावीरः शुभम खटाळे;

पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब : 20 षटकात 9 गडी बाद 138 धावा (संजय एन.31, सुमित दिघे नाबाद 33, शैलेश एस. 22, कपिल बिनयकिया 3-36, चिन्मय कुर्वे 2 -8) पराभूत वि.कल्याण क्रिकेट क्लबः 18.3 षटकात 9 गडी बाद 139 धावा (केतन परमार 56 (40, 7 चौकार, 3 षटकार), रोहन चंकेश्‍वरा 27, सुमित दिघे 3-23, निखील नासेरी 3-30); सामनावीरः केतन परमार;

स्टॅलियन्स् क्रिकेट क्लब : 15.4 षटकात 10 गडी बाद 91 धावा (गीत देसाई 20, तुशार सिन्हा 3-8, कार्तिक अय्यर 2-13) पराभूत वि. रायझिंग बॉईजः 12 षटकात 3 गडी बाद 95 धावा (जय कुमार 43, लखन पारसे 20, पवन आनंद 1-22); सामनावीरः तुशार सिन्हा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.