Pune News : डीएसकें’ना जामीन, तरीही जेलमध्येच, का? 

एमपीसी न्यूज – गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी 2019 पासून तुरुंगात आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यामुळे डीएसकेंना (Pune News) मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असं असलं तरीही डीएसके तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण डी एस कुलकर्णी यांच्या विरोधात इतरही ठिकाणी गुन्हे दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्यांना अद्यापही जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आणखी काही काळ तुरुंगातच राहावे लागणार अशी शक्यता आहे.  

 

मागील तीन वर्षाहून अधिक काळ डीएसके तुरुंगात आहेत. महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्यानुसार डीएसके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Pune News) याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात देखील डीएसकेंना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर मंगळवारी आणखी एका गुन्ह्यात डीएसकेंना जामीन मंजूर केला आहे.

 

 

Uddhav Thackeray : तुम्ही घाणेरड्या पध्दतीने मुख्यमंत्रीपद मिळविले – उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका

 

दरम्यान मंगळवारी डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि रितेश येवलेकर यांनी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला या जामीनदार उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने मात्र डीएसकेच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. मात्र अजूनही डीएसके यांच्यावरील दोषारोप निश्चित झालेले नाहीत. त्यांची बँक खाते आणि संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावरील खटल्याला देखील अद्याप सुरुवात झाली नाही. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर (Pune News) योग्य तो विचार करावा, असा युक्तिवाद डीएसकेंच्यावतीने केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.