Pune News : लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात दत्तजयंतीनिमित्त उद्या दत्तजन्म सोहळा व पालखी नगरप्रदक्षिणा 

एमपीसी न्यूज – श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे 125 व्या दत्तजयंती सोहळ्यांतर्गत दत्तजयंतीनिमित्त उद्या (बुधवारी) पहाटे सहा पासून (Pune News) मंदिर खुले राहणार असून संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दत्तजयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम, दत्तजन्म सोहळा, पालखीची भव्य नगर प्रदक्षिणा होणार आहे. दत्तमंदिराला विविधरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी यांनी दिली.

यासाठी बुधवारी सकाळी साडे सहा वाजता ट्रस्टचे विश्वस्त अक्षय हलवाई व कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र, त्यानंतर ट्रस्टचे विश्वस्त राजू बलकवडे व कुटुंबियांच्या हस्ते श्री दत्तयाग होईल.(Pune News) सकाळी साडे आठ वाजता प्रात: आरती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.पांडुरंग व वर्षा थोरवे यांच्या हस्ते तसेच दुपारी साडे बारा वाजता राजकुमार चोरडिया व कुटुंबियांच्या हस्ते माध्यान्ह आरती होणार आहे.

Alandi News : आळंदी मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे यांचे दत्तजन्म कीर्तन सायंकाळी पाच वाजता असून सायंकाळी 5 वाजून 55 मिनीटांनी वाजता दत्तजन्म सोहळा पार पडेल. त्यानंतर सायंकाळी सात वाजता पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कर्नाटक संकेश्वर पीठाचे प.पू. सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती उपस्थित राहणार आहेत. पालखी सोहळ्यात पारंपरिक बग्गी, घोडे, उंट, विद्युत छत्र्यांसह बँड, रुद्र ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे. रात्री साडे दहा वाजता मंदिरात पारंपरिक पालखी व पदे होणार आहे.

दत्तमंदिराचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी म्हणजेच 125 वे वर्ष आहे. भाविकांच्या स्वहस्ते अभिषेकाची सुविधा सकाळी सात ते सायंकाळी 5 पर्यंत मंदिरासमोरील उत्सव मंडपात करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, (Pune News) खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.