Pimpri News : अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहणार

एमपीसी न्यूज – ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सुधारणा केली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत बदला केला आहे. सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. 1 मे पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

14 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू केली आहे. कलम 144 लावले आहे. 1 मे पर्यंत संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील खरेदीच्या नावाखाली नागरिक बाहेर पडत होते. त्यामुळे प्रशासनाने आदेशात सुधारणा केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील सर्व प्रकारची किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी,  मिठाई, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने, चिकण, मटण, मासे आणि अंडी विक्री करणारी दुकाने, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थासाठी साहित्याची निर्मिती करणारे दुकाने   सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच  सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. या आस्थापनामार्फत घरपोच पार्सल सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुरू राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.