Crime News : चिंचवड येथील व्यावसायिकांना तलवारीचा धाक दाखवत खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील व्यावसायिकांना तलवारीचा धाक दाखवत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.2) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडला.

 

 

याप्रकरणी राजेंद्र जयकर शेट्टी (वय.28 रा चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ओंकार उर्फ हेमंत ओव्हाळ व अक्षय जगताप (दोघेही राहणार भिमनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे  शेट्टी यांच्या चेतना बार अँड रेस्टॉरंटवर आले व त्यांनी तलवारीचा धाक दाखवत दहा हजाराचा हप्ता देण्याची मागणी केली.शेट्टी यांनी नकार देताच आरोपींनी हॉटेलची तोडफोड करत शेट्टी यांना शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शेजारी असणाऱ्या श्री ग्राफिक्स फ्लेक्स प्रिंटींग व कृष्णा सुपर मार्केट येथील दुकान मालकांनाही शिवीगाळ करत तलवार दाखवत दहशत पसरवली.

 

 

 

यावेळी त्यांनी तेथे उपस्थित नागरिकांसमोर तलवारी हवेत उंचावून दहशत निर्माण केली.यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.