Pune Crime News : धनकवडी येथे दोन जुगार अड्ड्यावर छापा;दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धनकवडी येथील दोन जुगार अड्यांवर छापे टाकले आहेत.ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.1) सायंकाळी केली.

 

या कारवाईमध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुनील निर्मळ (रा. धनकवडी) याच्यासह 6 रायटर, 13 खेळी व 4 जुगार अड्डा मालक व 12 अनोळखी इसम असे 35 आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Pune News : गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना निर्मळ हा त्याच्या साथीदारांसह त्याच्या राहत्या घरी व मुंबईमटका जुगार या दोन ठिकाणी एकाचवेळी सट्टा खेळत आहे, अशी खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी निर्मळ याच्या घरी व मुंबई जुगार अड्डा येथे छापा मारला.या छाप्यात पोलिसांनी 9 हजार 70 रुपये रोख रक्कम,1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे मोबाईल, 22 हजार 400 रुपयांचे जुगार साहित्य असा एकूण 1 लाख 52 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.