Bhosari News : वाहनांचे बनावट पार्ट विकल्याप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हुंदाई कंपनीचे स्वामित्व असलेल्या हुंदाई कंपनीचे वेगवेगळे बनावट पार्ट विकणा-या एका दुकानदारावर फसवणूक आणि कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) दुपारी चार वाजता पोपटलाल डी मेहता स्पेअर पार्टस दुकान, कासारवाडी येथे घडली.

दिनेश गंडालाल शहा (वय 65, रा. दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी हुंदाई कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी रेवणनाथ विष्णू केकाण (वय 38, रा. हडपसर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या फायद्यासाठी हुंदाई कंपनीचे स्वामित्व असलेल्या हुंदाई कंपनीचे वेगवेगळे 31 हजार 710 रुपये किमतीचे 29 बनावट स्पेअर पार्टस विक्रीसाठी त्याच्या दुकानात ठेवले. यामुळे हुंदाई कंपनीची आणि गि-हाईकांची फसवणूक झाली आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 420, कॉपीराईट ऍक्ट 1957 चे कलम 51, 63, 64 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.