Pune Crime News : ‘त्या’ बहुचर्चित प्रकरणी पती, वकील आणि महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पत्नीऐवजी भलत्याच महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून पत्नीच्या नावे असणारे प्रॉपर्टी स्वतःच्या नावे करून घेतल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, पतीचा मित्र, वकील आणि एका अनोळखी महिलेविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पती राहुल शिवाजीराव जाधव (वय 32), वकील प्रदीप बी जाधव, पतीचा मित्र दीपक चव्हाण आणि एका अनोळखी महिलेविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कविता राहुल जाधव (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या राहुल जाधव यांच्या पत्नी आहेत. दोघा पती पत्नीच्या नावाने आंबेगाव येथील साई रेसिडेन्सी या इमारतीत तीन फ्लॅट होते. तसेच आंबेगाव परिसरात आणखी एक मिळकत देखील दोघांच्या नावे होती. परंतु या प्रॉपर्टीचे सर्वाधिकार आपल्याकडेच राहावे यासाठी राहुल जाधव यांनी इतर आरोपींना हाताशी धरून दुय्यम निबंधक कार्यालयात पत्नि ऐवजी दुसऱ्याच महिलेला उभे केले आणि कधीही रद्द न होणारा बनावट दस्तऐवज तयार करून घेऊन कुलमुखात्यारपत्राचा गैरवापर केला. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.