Dighi News : उघड्या दरवाजावाटे साडेसहा लाखांचे दागिने आणि रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून सहा लाख 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 18 जून रोजी दत्तगडनगर दिघी येथे उघडकीस आली. याबाबत सहा जुलै रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय निवृत्ती लोखंडे (वय 60, रा. दत्तगडनगर, दिघी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दत्तगडनगर येथे रो हाऊस आहे. 14 एप्रिल ते 18 जून या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रो हाऊस मध्ये प्रवेश केला. घरातून 152 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सहा लाख 44 हजार 191 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.