Maternity Hospital: अखेर 2 वर्षांनी पुणे महानगरपालिकेची 15 प्रसूती रुग्णालय आता सेवेसाठी पुन्हा सज्ज

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे सुमारे दोन वर्षांपासून महापालिकेचे (Maternity Hospital) प्रसूती वॉर्ड बंद होते. आरोग्य विभागातील बहुतांश डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांसाठी काम करत होते. त्यामुळे या प्रसूती रुग्णालयांचा वापर होत नव्हता. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने महापालिकेचे प्रसूती वॉर्ड पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक औषधे आणि उपकरणे तेथे उपलब्ध करून देण्यात आली होती. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.

देशात कोविड-19 चे सर्वाधिक बाधित रुग्ण पुण्यात आढळले. त्यामुळे पीएमसीच्या 17 पैकी 15 प्रसूती रुग्णालयातील सेवा बंद करावी लागली. महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल आणि सोनवणे मॅटर्निटी हॉस्पिटल या दोन रुग्णालयांमध्ये प्रसूती सुविधा ठेवण्यात आल्या होत्या. कमला नेहरू रुग्णालयात बिगर-कोरोना बाधित गर्भवती महिलांसाठी प्रसूती वॉर्ड होता, तर सोनवणे रुग्णालय हा कोरोना संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी राखीव होता. बंद पडलेली प्रसूती रुग्णालये आता दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Pimpri Corona Update: शहरात आज 121 नवीन रुग्णांची नोंद, 99 जणांना डिस्चार्ज

महापालिकेच्या रुग्णालयात वर्षभरात 6 हजार 610 प्रसूती झाल्या. ज्यातून बहुतांश प्रसूती कमला नेहरू आणि सोनवणे हॉस्पिटलमध्ये झाल्या. राजीव गांधी हॉस्पिटल आणि सुतार हॉस्पिटलमध्येही आता सुविधा उपलब्ध आहेत.

त्यानुसार महापालिकेची प्रसूती रुग्णालये सुरू करण्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती करून त्यानंतर नवीन उपकरणे ताब्यात घेतली जातात. डॉक्टर आणि परिचारिकांना (Maternity Hospital) पुन्हा प्रशिक्षित करून स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.