Shirur News : शिरूर तालुक्यातील करंदी गावात वनविभागाने बिबट्याला पकडले

एमपीसी न्यूज – शिरूर तालुक्यातील करंदी गावात वनविभागाने एका बिबट्याला सोमवारी रेस्क्यू केल्याची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली आहे.

करंदी गाव शिक्रापूरपासून दहा ते पंधरा किलोमीटर दूर आहे तर शिरूरपासून 30 ते 35 किलोमीटर लांब आहे.म्हसेकर म्हणाले की, बिबट्या नियमितपणे करंदी गावातील लोक वस्तीमध्ये येत होता.त्याने आजूबाजूच्या परिसरातील शेळ्या मेंढ्यांवरती हल्ले केले होते.त्यामुळे

ग्रामपंचायतच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार रुजीरंग ढोकळे व राहुल ढोकळे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता.

वनपाल प्रवीण क्षीरसागर म्हणाले की, परवा सकाळी  ढोकळे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेल्यावर त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला.आवाजाच्या दिशेने गेल्यावर त्यांना बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला दिसला.त्यांनी लगेच वन विभागाला त्याबाबत कळविले.

म्हसेकर म्हणाले की, लगेच वन विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले व बिबटयाला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात नेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.