Bhosari Crime News : फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून 18.50 लाख रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून 18.50 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑक्टोबर 2015 ते 14 मार्च 2022 या कालावधीत स्पाईन रोड, एमआयडीसी भोसरी येथे ही घटना घडली.

जगदीश रामु (रा. दिघी, मुळगाव, बेंगलोर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महेश बापु लोंढे (वय 40, रा. येरवडा) याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी जगदीश यांच्यासह गजानन घाटगे व विना नागपठाणी यांना दिघी आळंदी रोड, मिरॅकल 9 या साईटवर फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवले, त्यासाठी 18.50 लाख रूपये घेतले आणि फ्लॅट न देता फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.