MSEB : एमएसईबी मधून बोलत असल्याचे भासवून ऑनलाइन चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एमएसईबी (MSEB) ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून एका व्यक्तीला दोन अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर व्यक्तीच्या दोन बँक खात्यातून अज्ञाताने चार लाख तीन हजार 992 रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि. 23 मे) रात्री साडेआठ ते सव्वानऊ वाजताच्या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.

याप्रकरणी प्रजेस सुरेश संकपाळ (वय 45, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nighoje : निघोजे येथील कंपनीतून 14 लाखांचे जॉब पार्ट चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी (MSEB) यांना फोन करून तो एमएसईबी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे लाईटबील तुम्ही भरले नाही. ते मला सिस्टीममध्ये दिसत नाही. तुम्ही जर लाईटबील भरले नाही, तर आम्ही तुमची लाईट लगेच कट करू’ असे फिर्यादी यांना आरोपीने सांगितले.

फिर्यादी घाबरले आणि ‘तुम्ही आमची लाईट कट करू नका, मी लाईटबील ऑनलाईन भरून घेतो’ असे आरोपीला सांगितले. त्यावर आरोपीने फिर्यादी यांना MHEVITARAN आणि ANY DESK REMOTE DESKTOP SOFTWARE हे अॅप इंन्स्टॉल करायला लावले. त्यानंतर फिर्यादी यांच्या दोन बॅंक खात्यावरील एकूण चार लाख तीन हजार 992 रुपये कट झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.