Pune News : शेअर मार्केटमध्ये जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 42.45 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटमध्ये जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत 42.45 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2021 या कालावधित धायरी येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक आणि बँकेच्या खातेधारकाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धायरी येथील 39 वर्षीय पुरूषाने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी इंटेलिजन्ट ट्रेडिंग 1000 % नावाने वॉटस्अप ग्रुप तयार केला व फिर्यादी यांना त्या ग्रुपमध्ये समाविष्ट कारून घेतले. शेअर मार्केटमध्ये जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून, वेळोवेळी स्वत:च्या खात्यावर पैसे पाठवल्या सांगून फिर्यादी यांची 42 लाख 45 हजार 500 रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.