Pune News: पुण्यातील शाळा 15 डिसेंबर पासून सुरू होणार

एमपीसी  न्यूज : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे महापालिकेने उद्या पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्तास तरी लांबणीवर टाकला असून शाळा15 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिली.

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. शाळा सुरू करण्या संदर्भात आज पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात चर्चा झाली. यावेळी पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुढील परिस्थिती पाहून शाळा कधी सुरू करायच्या हा निर्णय घेतला जाणार आहे.

तर मुंबई महापालिकेने 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच नाशिक महापालिकेनेदेखील 10 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.