Pune : संचेती हॉस्पिटलतर्फे मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, संधिवात, मणक्यांचे जुने आजार, स्पोर्ट इंज्युरी अश्या वेगवेगळ्या हाडांच्या विकारांनी बाधित असण्याऱ्या रुग्णांसाठी संचेती हॉस्पिटलच्या वतीने उद्या (शनिवार) सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

नुकताच पितृदिनानिमित्त "पितृदेवो भव सप्ताह" (16 जुन ते 23 जून) साजरा केला गेला, या अभिनव उपक्रमाअंतर्गत सर्व पित्यांना आजाराबद्दल मोफत सल्ला व उपचार देण्यात आले. त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संचेती हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.