Maval News : आंदर मावळ मधील तीन पाणी पुरवठा योजनांसाठी अडीच कोटींचा निधी

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून मिळाला निधी

एमपीसी न्यूज – आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून वडेश्वर-माऊ व घोणशेत येथील तीन पाणीपुरवठा योजनांसाठी दोन कोटी 57 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत हा निधी उपलब्ध झाला आहे. या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामाचे भुमिपूजन बुधवारी (दि. 5) महिलांच्या हस्ते संपन्न झाले. या कामामुळे आंदर मावळातील 12 वाड्या वस्त्यांवर नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, सुप्रिया मालपोटे, रंजना सातकर, अधिका तनपुरे, राजश्री शिळीमकर, शुभांगी दरेकर,माजी जिल्हा परिषद सदस्य अतिश परदेशी, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ,

देविदास गायकवाड, घोणशेतचे सरपंच अंकुश खरमारे, उपसरपंच लक्ष्मीबाई पालवे, सदस्य रुपाली गरुड, कविता चोरघे, मनिषा राक्षे, गजानन खरमारे,पोलीस पाटील मोनिका कचरे, माऊ-वडेश्वर सरपंच छाया हेमाडे, उपसरपंच माऊली जगताप, सदस्य कुंदाताई मोरमारे, सुरेखा शिंदे, हेमांगी खांडभोर, रुपाली सुपे, मनिषा दरेकर, वासुदेव लष्करी,दत्ता चिमटे, शिवराम शिंदे, निलेश साबळे आदि.मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून जल जीवन मिशन अंतर्गत वडेश्वर येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 86 लाख 77 हजार, माऊ येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 87 लाख 55 हजार व घोणशेत येथील नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 82 लाख 92 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून लवकरच या पाणी पुरवठा योजनांच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

या नळ पाणी पुरवठा योजनांमुळे घोणशेत परिसरातील वाऊंड, कचरेवाडी,लंकेवाडी, देशमुखवाडी, खरमारेवाडी, माऊ येथील मोरमारेवाडी, डोंगरवाडी, गभालेवाडी,दवणेवाडी आणि वडेश्वर येथील शिंदेघाटेवाडी,सटवाईवाडी, लष्करवाडी या वाड्यावस्त्यांवर घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याने या भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठीची  वणवण थांबणार आहे.

मागील अनेक वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार शेळके यांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याने येथील नागरिकांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.