Pimpri News : प्राधिकरण गृहप्रकल्प इमारतींना गड किल्ल्यांची नावे द्या – गजानन बाबर 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण मार्फत सेक्टर 12 मध्ये अल्प उत्पन्न गट व आर्थिक दुर्बल गट प्रकारातील गृहप्रकल्प विकसित केला जात आहे. या गृहप्रकल्पातील इमारतींना महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची नावे द्यावीत अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. 

गजानन बाबर यांनी याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संयुक्त निवेदन दिले आहे. गड-किल्ल्यांची परंपरा जतन करण्यासाठी सेक्टर क्रमांक 12 मध्ये विकसित होत असलेल्या इमारतींना गड किल्ल्यांची नावे द्यावीत. 21 मे 2021 रोजी प्राधिकरणाच्या लॉटरी पद्धतीने सोडत आहे, यापूर्वी ही नावे द्यावीत अशी मागणी बाबर यांनी या निवेदनात केली आहे.

दरम्यान, प्राधिकरणाच्या सदनिकांसाठी मागवलेल्या अर्जाची 21 मे रोजी ऑनलाईन सोडत केली जाणार आहे. राज्याचे उपमुख्य मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता अल्पबचत भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.