Pune News : ‘विजय ज्योती’ ने उजळल्या युद्धाच्या गौरवशाली आठवणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विजय ज्योतीचे आगमन

एमपीसी न्यूज : भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, विरपुत्रांच्या सन्मानाने, देशभक्तीपर कार्यक्रमाने, वाजत गाजत भारताच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या ‘विजय ज्योती’ चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आगमन झाले. यावेळी  युद्धच्या गौरवशाली स्मृतींनी विद्यापीठ उजळून निघाले.

आझादी का अमृतमहोत्सव आणि 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धच्या गौरवशाली विजयाला 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजय ज्योतीचे हस्तांतरण देशाच्या कानाकोपऱ्यात हा विजयोत्सव पोहोचण्याच्या उद्देशाने केले आहे. या ज्योतीचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आगमन झाले. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार ते संरक्षण व समारीकशास्त्र विभाग अशी स्वागतपर रॅली यावेळी काढण्यात आली.

यावेळी विरपुत्र लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, ब्रिगेडियर पीएसएस राजन, कमांडर बीपीनचंद्र भास्कर भागवत, कमांडर जे.व्ही. नातू यांच्या पत्नी नंदा नातू, गोविंद मासाळकर यांच्या पत्नी कलावती मासाळकर आदींचा डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डॉ. करमळकर म्हणाले, भारतीय सैन्य आणि विद्यापीठाचं एक अतूट नातं आहे. विद्यापीठात सैन्याबाबत संशोधन अभ्यास तर केला जातोच पण त्यासोबतच सैन्यातील अधिकाऱ्यांसाठी अनेक कार्यक्रमही घेण्यात येतात.

लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठाशी जोडले जात असल्याचा अभिमान व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.