Gopal Tiwari : राम मंदीर नेस्तनाबूत होण्याची कोषाध्यक्षांची शंका, ‘मन व्यथित’ करणारी स्वामी गोविंददेव गिरींचे विधान गंभीर सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्या प्रमाणे  अयोध्येत श्री राम मंदीर ऊभारणी होत असतांनाच् (Gopal Tiwari)मंदीर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज स्वतःच् जर मंदीर नेस्तनाबूत(?) होण्याच्या ‘संभाव्य कट वा संकटा’बाबत शंका उपस्थित करत असतील तर ती ‘मन व्यथित’ करणारी बाब असुन, देशांत अद्यापही सत्ताधीशांना अनुकुल संस्थांकडुनच् रचनात्मक (Constructive) कार्या ऐवजी विध्वंसक (Destructive) बाबीं विषयी शंका उपस्थित होत आहे.ही अतिशय गंभीर व दखल घेण्याजोगी बाब आहे.

‘उत्तर प्रदेशचे योगी सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या’ कार्यक्षमते विषयी व मंदीराच्या सुरक्षे विषयी प्रश्नचिन्ह ऊपस्थित करणारी वेदना देणारी खेदजनक बाब आहे.

त्यासाठी श्रीराम मंदीर नेस्तनाभुत’ होण्याच्या (Gopal Tivari)जाहीर शंके विषयी सर्वोच्च न्यायालयाने श्री राम मंदीर कोषाध्यक्षांच्या गंभीर विघानाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

Juni Sangvi : दारू पिऊन घाण का करता म्हणून हाटकले म्हणून गर्दुल्यांनी ज्येष्ठ नागरिकाला केली मारहाण
ते पुढे म्हणाले खरेतर सर्वोच्च न्यायालया च्या निर्देशा नुसार, ‘मंदीर न्यास निर्माण करून – मंदीर ऊभारणी सुरु करे पर्यंतच्’ केंद्र सरकारची भुमिका होती. मात्र भुमि पुजन ते ऊदघाटन यामध्ये पंतप्रधान सतत हस्तक्षेप करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात मात्र मंदीराच्या सुरक्षे बाबत, कोषाध्यक्षांना खात्री नसल्याचेच् त्यांचे विधाना वरून स्पष्ट होते आहे.

देशातील सत्ताधाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था सांभाळणे, जनतेस दिलेली आश्वासने पुर्ण करणे, वाढती महागाई – बेरोजगारी, देशावरील वाढते कर्ज, वाढत्या शेतकरी आत्महत्या व घटता विकासदर यावर लक्ष केंद्रीत करणे, सामाजिक शांतता, सलोखा व सुरक्षा राखणे ही सरकारचीच कर्तव्ये आहेत.
मात्र स्वामी गिरी महाराजांचे वरील वक्तव्य पाहतां सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम मंदीराचे कार्य व सुरक्षेची जबाबदारी स्वअखत्यारीत घ्यावी, असे प्रतिपादन तिवारी यांनी केले.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या निर्मिती नंतर, पु्र्वीच्या काँग्रेस प्रणीत सरकारांच्या काळात खरे तर भारतातील इतर धर्मियां प्रमाणेच, हिंदू तिर्थ-क्षेत्रांचा, देवस्थानांचा ही विकास होऊन भारतीय संस्कृतीचे, देवस्थानांचे सदैव संरक्षण व संवर्धनच झाले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींचे काळातच, देशवासियांना दुरदर्शन द्वारे “रामायण – महाभारताचे तब्बल 84 व 98 एपिसोड २ वर्षे दाखवले गेले”, कधीही व कोणत्याही प्रकारे हिंदू वा इतर धर्मियांच्या मनांत द्वेष, आकस वा असुरक्षीततेची भावना ऊत्पन्न झाली नव्हती, याकडेही तिवारी यांनी लक्ष वेधले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.