Hadapsar : अमनोरा पार्क मधील फ्लॅटमधून जुगार साहित्य व सुगंधी तंबाखू जप्त

एमपीसी न्यूज – हडपसर भागातील अमानोरा पार्क  (Hadapsar) या सोसायटीतील सदनिकेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, हुक्क्याची सुगंधी तंबाखू, मोबाइल संच असा पाच लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हडपसर भागातील अमानोरा पार्कमधील एका सदनिकेत काहीजण पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

 

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सदनिकेत छापा टाकला. पोलिसांनी सदनिकेतून दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 41 हजार रुपयांची रोकड, 14 हजार रुपयांची हुक्क्याची सुगंधी तंबाखू, जुगाराचे साहित्य असा पाच लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार (Hadapsar) प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, सागर केकाण, अमेय रसाळ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ आदींनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.