Alandi News : आळंदीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत समाजप्रबोधन संदेशासह हरिनामाचा गजर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे शासन नियम, अटी, निर्बंधामुळे गणेशोत्सवाला व गणेश विसर्जन मिरवणुकीला मर्यादित स्वरूप प्राप्त झाले होते.यंदा ते कोणतेही निर्बंध नसल्याने गणेशोत्सव सर्वत्र  अगदी उत्साहात पार पडला.

आळंदीमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक ही समाजप्रबोधन जनजागृतीपर,हरिभजनाच्या भक्तिरसाने, आकर्षक देखाव्यासह, ढोल ताश्यांचा जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी जय गणेश मित्र मंडळाने भक्तीरथासह हरिभजनात, जय गणेश प्रतिष्ठाने स्वराज रथासह समाजजागृतीपर भारुड कार्यक्रम, अखिल भाजी मंडईने ढोल ताशा आकर्षक विद्युत रोषणाई,एकलव्य प्रतिष्ठानने हत्तींच्या देखाव्यासह विविध रंगाची विद्युत रोषणाई, ढोल ताशे,शिवतेज मित्र मंडळ ढोल ताशे,

Today’s Horoscope 10 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

श्री दत्त नगर प्रतिष्ठान आकर्षक देखाव्यासह ढोल ताशे,पद्मावती मित्र मंडळ महापुरुष रथ ढोल ताशे,न्यु दत्त नगर केदारनाथ देखाव्यासह ढोल ताशे,शिवस्मृती प्रतिष्ठाण ने लालबागच्या राजासह ढोल ताशे,धर्मराज ग्रुप कोळी देखाव्यासह ढोल ताशे,श्री सुवर्णयुग प्रतिष्ठाण विद्युत रोषणाईसह ढोल ताशे तसेच घुंडरे आळी, चाकण चौक,मरकळ रस्ता,वडगांव रस्ता,चऱ्होली रस्ता येथील लहान मोठ्या मंडळांनी ही गणेश विसर्जन मिरवणुक पारंपरिक वाद्यासह जल्लोषात साजरी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.