Pune News : सराफाच्या शेजारचं दुकान भाड्याने घेतले, भिंतीला भगदाड पाडून लाखोंचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज : सराफाच्या दुकानात शेजारी असणारे दुकान भाड्याने घेतले. त्यानंतर सराफ दुकान बंद करून घरी गेल्यानंतर भिंतीला भगदाड पाडून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माऊली ज्वेलर्स मध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्यांनी एक किलो पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली ज्वेलर्स यांच्या दुकाना शेजारील एक दुकान आरोपींनी भाड्याने घेतले होते. त्याठिकाणी मसाल्याचे दुकान टाकायचे असल्यामुळे काम सुरू होते. त्यामुळे माऊली ज्वेलर्स च्या मालकांना संशय आला नाही. दरम्यान शुक्रवारी दुपारी माऊली ज्वेलर्स बंद करून मालक जेवण्यासाठी घरी गेले होते. नेमकी हीच संधी साधून आरोपींनी दुकान यांच्यामध्ये असलेल्या भिंतीला भलेमोठे भगदाड पाडले. आणि दागिने घेऊन पळ काढला.

दरम्यान माऊली ज्वेलर्सचे मालक सायंकाळी दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.