Wakad News : मोबाईल ॲपद्वारे लग्नाचे आमिष, गिफ्ट पाठवल्याचे सांगून 8 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे झालेल्या ओळखीतून इसमाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. गिफ्ट पाठवल्याचे सांगून महिलेला 8 लाख 21 हजार 800 रुपयांना गंडा घातला. 19 फेब्रुवारी 2022 रोजी वाकड परिसरात ही घटना घडली. 

वाकड पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या महिलेनं शुक्रवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. त्यावरून आरव महिप ॲम्सटरडॅम, नेदरलँड्स या इसमाविरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 419, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी), 66 (डी) अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी यांची Bumble App द्वारे ओळख झाली. आरोपी आरव याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. फिर्यादी महिलेला गिफ्ट पाठवले असल्याचे सांगून ते दिल्ली कस्टम विभागात आहे असे सांगितले. गिफ्ट घेण्यासाठी वेगवेगळे कारण सांगून त्यापोटी महिलेकडून 8 लाख 21 हजार 800 रुपये घेतले व फसवणूक केली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.