Pimpri News : घरभेटीद्वारे शहरातील 51 हजार 467 बालकांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील 51 हजार 467  बालकांचे घरभेटीद्वारे लसीकरण करण्यात आले आहे. महापालिका परिसरात केंद्रशासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार 27 फेब्रुवारीला लसीकरण आयोजित करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये 27 फेब्रुवारीला 1 लाख 88 हजार 838 १ बालकांना लस देण्यात आली होती. तर, घरभेटीद्वारे 51 हजार 467  बालकांचे लसीकरण करण्यात आले.

मोहिमेमध्ये एकूण 2 लाख 40 हजार 305  बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करुन 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 28 फेब्रुवारी पासून महापालिका कार्यक्षेत्रातील 5 वर्षाखालील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण झाले आहे, याची खात्री करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. 1995  पासून आयोजीत होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे हे 27 वे वर्ष आहे.

या कालावधीत महापालिका क्षेत्रात पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. शहरातील 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी 67 वैद्यकीय अधिकारी, 220 पर्यवेक्षक आणि 3122 लसीकरण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.