Hinajawadi Crime News: विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या चायनीज विक्रेत्यावर कारवाई; दोन लाख 37 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – विनापरवाना विदेशी दारू आणि बियरची विक्री करणा-या एका चायनीज विक्रेत्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. यात एक लाख 36 हजार 480 रुपयांची विदेशी दारू आणि बियर यासह दोन लाख 37 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सागर अनिल जाधव (वय 27, रा. हिंजवडी), निलेश रमेश धुमाळ (वय 33, रा. शेळकेवाडी, घोटावडे, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी जवळ असलेल्या बापूजी बुवा मंदिराच्या जवळ एका चायनीज तंदूर सेंटरवर विनापरवाना दारू विक्री केली जात असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. पोलिसांनी श्री चायनीज तंदूर सेंटर या दुकानावर छापा मारून कारवाई केली.

त्यात पोलिसांनी एक लाख 36 हजार 480 रुपयांची विदेशी दारू आणि बिअर, पाच हजार 970 रुपये रोख रक्कम, 80 हजारांचा एक ॲपे टेम्पो (एम एच 14 / इ एम 6986) आणि 15 हजारांचे दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 37 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.