Hinjawadi Crime News : हिंजवडी, सांगवीमध्ये दोन घरफोड्या

एमपीसी न्यूज – हिंजवडी आणि सांगवी परिसरात दोन घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 88 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 7) हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रवींद्र बाळू येळवंडे (वय 33, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 6) रात्री साडेअकरा ते मंगळवारी (दि. 7) सकाळी साह वाजताच्या कालावधीत खिडकीचे ग्रील तोडून अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला. फिर्यादी यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

ताईबाई राम शेवकर (वय 56, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, दोन घड्याळ असा एकूण एक लाख 88 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सोमवारी (दि. 6) दुपारी चार ते साडेचार वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.