Hinjawadi News: जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अस्तित्वात नसलेला रस्ता कागदावर दाखवून त्यानुसार बांधकामाचा प्लॅन मंजूर केला. तसेच एकाची जागा हडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2021 ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत बावधन येथे घडला.

राजेंद्र बाळनाथ भुंडे (वय 46, रा. कोथरूड, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एस. आर. ए. प्रमोटर्स अॅण्ड डेव्हप्लर्स लि यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत व कट रचून फिर्यादी यांनी सोपवलेल्या मालमत्तेची अप्रमाणिकपणे अफरातफर केली. फिर्यादी यांना खोटी प्रलोभने दाखवून फिर्यादी यांना त्यांच्या मालकीची जमीन देण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा विश्वासघात करुन बनावट आराखडा बनवून फिर्यादी यांची ठकवणूक केली.

तसेच आरोपी (बांधकामकर्ता) याने खोटे नाव दाखवत तसेच फिर्यादी यांचा 7 / 12 (किंमती प्रतिभूती) च्या संदर्भात सन 2019 च्या मंजुर आराखडयातून खोटे दस्त दाखवले. त्यातून फिर्यादी यांची जमीन हडपण्याचा डाव रचला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.