Hinjawadi : खासगी कारमध्ये पोलीस साहित्य बाळगणाऱ्या एकास अटक

एमपीसी न्यूज – पोलीस खात्यात नोकरीस नसताना पोलिसांचे साहित्य खासगी कारमध्ये ठेवल्यावरून एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई राधा हॉटेल चौक म्हाळुंगे येथे शनिवारी (दि. 31) पहाटे करण्यात आली.

सुदेश शिवाजी नवले (वय 37, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विकास रामदास सानप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुदेश पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलामध्ये कुठेही नोकरीस नाही. तसेच तो कोणत्याही सरकारी शाखेत नोकरीस नाही.

तरीही त्याने स्वतः पोलीस असल्याचे भासविण्यासाठी खासगी कार (एमएच 14 / जी एस 4336) मध्ये पोलिसांचा मोनोग्राम असलेला चामडी बेल्ट, पोलीस मोनोग्राम असलेली टोपी व पोलीस नावाचा लाल रंगाचा इंग्रजी अक्षरांचा बोर्ड असे साहित्य ठेवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.