Lonavala : नेपाळी समाजाचा हरितालिका तिज कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – नेपाळी समाजामधील लोकप्रिय असलेला हरितालिका तिज हा कार्यक्रम लोणावळा नेपाळी समाज मंडळाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

नेपाळमध्ये हरितालिका तिजचे खूप महत्त्व आहे. या दिवशी विवाहित महिला तिज साजरा करण्यासाठी आपल्या माहेरी येतात व आपल्या माहेरच्या माणसांबरोबर हा सण साजरा करतात. नेपाळी महिला तिजच्या एक दिवस अगोदर उपवास करुन शिव-पार्वतीची आराधना करत

आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि माहेरच्या सुख समृध्दीची प्रार्थना करतात. लोणावळा व परिसरात कामानिमित्त स्थायिक झालेल्या नेपाळी बांधवांचे समाज मंडळ स्थापन करत त्यामाध्यमातून पारंपारिक सण उत्सवाला चालना देण्याचा प्रयत्न या मंडळाकडून सुरु आहे.

उद्योजक सुधाकर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नगरसेविका सेजल परमार, चैतन्य नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण जोशी, ब्राम्हण समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुधिर राईलकर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी, तसेच गणेश थिटे, अक्षय काळे, प्रदीप वाल्हेकर, दादा धुमाळ, आशा खिल्लारे, गणेश इंगळे, नेपाळी समाज संघाचे अध्यक्ष बल्लु ( बलबहादुर ) बडेला, उपाध्यक्ष आशिष भंडारी, सचिव चंद्रदेव जोशी, खजिनदार दीपेन्द्र खडका, श्याम गुरुंग, अर्जुनसिंग बुढथा, महिला सदस्या कला सापकोटा, सचिना पराजुली आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.