Hinjawadi : चोरीच्या आरोपाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चोरीच्या आरोपाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारसाई येथे घडली.

सिकंदर शव्वाल शेख (वय 32, रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी मंजिल शव्वाल शेख (वय 24, रा. मारूंजी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर शेख, पत्नी रूक्‍साना सिकंदर शेख, सासू, मावस सासू, इब्राहिम अकबर शेख (वय 53, रा. कासारसाई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपआपसांत संगनमत करून सिकंदर यांना मानसिक त्रास दिला. तसेच सततच्या चोरीच्या आरोपीला कंटाळून रविवारी पहाटे त्याने आत्महत्या केली. इब्राहिम याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हिंगोले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.