HSC Exam Update : एचएससीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संकट आता जवळपास कमी झाल्याने राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचे ठरविले आहे. दरम्यान बारावीच्या ठरलेल्या परीक्षा तारखांमध्ये बदल करण्यात आले असून 5 मार्च आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या विषयांचे पेपर अनुक्रमे 5 एप्रिल व 7 एप्रिल रोजी आयोजित केल्याचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून कळविण्यात आले आहे. 

यंदाची बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असून परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. त्यानुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सदर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

 

दरम्यान, 5 मार्च आणि 7 मार्च रोजी नियोजित विषयांची परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून संबंधीत विषयांची परीक्षा अनुक्रमे 5 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बदलेल्या सदर परिक्षेचे वेळापत्रक पुन्हा एकदा राज्य शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.