Pune News : पुणे मेट्रोला उदंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 37 हजार पुणेकरांचा प्रवास

एमपीसी न्यूज : पुणे मेट्रोचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी उदघाटन केल्यानंतर रविवारी दुपारी 3 वाजेपासून गरवारे ते वनाज, आणि पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो सेवा सुरु करण्यात आली. दुपारी 2 वाजल्यापासून स्थानकांवर लोक येण्यास सुरवात झाली. पुणे आणि पीसीएमसी नागरिकांमध्ये प्रचंड  उत्साह दिसत होता.

मोठ्या संख्यने गृहिणी, जेष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विध्यार्थी, लहान मुले, संपूर्ण कुटुंब, महाविद्यालयीन ग्रुप  इत्यादी  नागरिक मोठ्या उत्साहाने मेट्रो स्थानकांवर येत होते आणि मेट्रोने प्रवास करत होते.

प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं ‘स्वर्ग सुख’! पिंपरी-फुगेवाडी मेट्रो प्रवास.. Day 2 | Ground Report व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

पुण्यात मेट्रो रेल्वे चालू होऊन पहिल्याच दिवशी म्हणजे 6 मार्च 2022 रोजी दुपारी 3 ते रात्री 9:30 पर्यंत 37752 लोकांनी प्रवास केला. प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. गरवारे स्थानकात असलेली प्रदर्शनी हा एक सेल्फी पॉईंट झाला आहे. मेट्रोमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रवासी फोटो, सेल्फी, घेत होते. पूर्ण स्टेशन जय भवानी, जय शिवाजी, गणपती बाप्पा मोरया अश्या घोषणांनी  दुमदुमले होते.

सोमवारी देखील तेवढ्याच उत्साहाने नागरिक मेट्रो रेल्वे स्थानकात येत होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 18439 प्रवाश्यानी मेट्रो सेवेचा वापर केला. त्यामध्ये पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे या मार्गिके मध्ये प्रवास केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.