Pimpari Chichwad News : शिवसेनेच्या रक्तदान शिबीरास प्रचंड प्रतिसाद

600 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज   : शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने  रविवारी साधुराम मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 600 जणांनी या शिबिरात रक्तदान केले. 

_MPC_DIR_MPU_II

मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेश नुसार आयोजित शिबिराचे उदघाटन, शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते झाले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके, जिल्हा संघटिका  सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, जिल्हा संघटक तुषार सहाणे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, निलेश मुटके, युवा सेना जिल्हा समन्व्यक सचिन सानप, सुरज लांडगे,कुणाल तापकीर, कुणाल जगनाडे, समन्व्यक दादा नारळे, राहुल भोसले, सुखदेव नरळे आबा भोसले,महिला आघाडी भोसरी संघटिका, वेदश्री काळे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर, मनीषा परांडे, सुजाता आल्हाट, रुपाली आल्हाट, रावसाहेब थोरात,विभाग प्रमुख योगेश जगताप, काका बोराटे, सतीश दिसलें प्रदिप चव्हाण विश्वनाथ टेमगिरे, नितीन बोन्डे, सतीश मरळ, गणेश इंगवले कृष्णा वाळके,राजू भुजबळ, प्रदिप सपकाळ, अनिल दुराफे, युवा नेते अजिंक्य उबाळे, प्रवीण खिलारे हे उपस्थित होते.

डॉ डी. वाय.पाटील ब्लड बँक व यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्यने आयोजित या शिबिरात रक्तदात्यास 8 जेबी पेन ड्राइव्ह यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेते खा. शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख धनंजयभाऊ आल्हाट यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.