Khalumbre News : अवैध मुरुम उत्खनन ; तिघांना अटक, 30.52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी अवैध पद्धतीने मुरुमाचे उत्खनन प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक जेसीबी, हायवा आणि मुरुम असा 30 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खालुब्रे, ता. खेड टॉप ब्रान्ड कंपनीच्या जवळ बुधवारी (दि.13) सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली. 

जेसीबी व हायवा मालक स्वप्निल संजय शिवेकर (वय 28, रा. इंदोरी, मावळ), अभिजीत आनंदराव शिंदे (वय 26, रा. कवठेमहांकाळ, सांगली) आणि राजेंद्र इश्वरचंद प्रसाद (वय 28, रा. खेड) असे अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खालुब्रे, ता. खेड टॉप ब्रान्ड कंपनीच्या जवळ मोकळ्या जागेत विक्रीसाठी अवैध पद्धतीने मुरुमाचे उत्खनन करताना आढळून आले. सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली व एक जेसीबी, हायवा आणि मुरुम असा 30 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.