Pune News : चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ; राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या सहकार्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ही तक्रार दाखल करण्यात आली. 

शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी एका 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांना अटक करावी या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला होता.

दरम्यान या प्रकरणातील पीडित तरुणी आता पुढे आली असून तिने चित्रा वाघ आणि इतरांनी रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात खोटा जबाब नोंदवण्यात भाग पाडल्याचा आरोप केला आहे. तसेच चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटे बोलायला भाग पाडले असे देखील तरुणीने म्हटले होते.

दरम्यान या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रार दिली आहे. चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.