India Corona Update : 24 तासांत 11,850 नवे कोरोना रुग्ण, 12,403 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 850 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 12 हजार 403 बरे कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 36 हजार 308 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही 274 दिवसांतील नीचांकी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 44 लाख 26 हजार 036 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 38 लाख 26 हजार 483 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.26 टक्के एवढा झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 555 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 63 हजार 245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 62 कोटी 23 लाख 33 हजार 939 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 12 लाख 66 हजार 589 नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 111.40 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 58,42,530 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.