Sangavi Crime News : दोन गायींची कत्तल करून गोमांस घेऊन जाणा-या चार जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – दोन गायींची कत्तल करून गोमांस घेऊन जाणा-या चार जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षक चौक, पिंपळे निलख येथील आर्मीच्या मोकळ्या मैदानात मंगळवारी (2 नोव्हेंबर) रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी शुक्रवारी (दि.12) सत्यवान नारायण कामठे (वय 34, रा. गणेश नगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी खंडोबा मंदिर चौक, पिंपळे निलख येथून दोन गायी गाडीत भरुन रक्षक चौक, पिंपळे निलख येथील आर्मीच्या मोकळ्या मैदानात उतरल्या. येथे त्यांनी गायींची कत्तल करून त्यांचे मांस गाडीत भरुन घेऊन गेले. फिर्यादी यांनी आरोपींचा पाठलाग केला असता त्यांना पिस्तूल व लोखंडी टॉमी दाखवला असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.