Chakan Crime News : हुंडाबळी ! पती, सासु – सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – हुंड्यासाठी विवाहीत महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासु – सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27-04-2019 ते 31-07-2019 या कालावधीत येलवाडी, ता. खेड याठिकाणी हा प्रकार घडला. 

नेहा सचिन बोत्रे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या वडीलांनी  म्हाळुंगे पोलीस चौकीत शुक्रवारी (दि.12) फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पती सचिन देवीदास बोत्रे (वय 38), सासु मुक्ता देवीदास बोत्रे (वय 52), सासरे देवीदास गणपत बोत्रे (वय 58) आणि दीर निलेश देवीदास बोत्रे (वय 32) (सर्व रा. येलवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 498 अ, 304 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहित महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, वारंवार टोचून बोलत मारहाण केली. अखेर त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.