Pune News : जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

10 जण अटकेत

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दहा जणांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देण्याचे काम करत होती. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट शिधापत्रिका, आधारकार्ड, सातबारा उतारे छायाचित्र, रबरी शिक्के असा मुद्देमाल जप्त केला आहे. खडकी आणि शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. 

गोपाळ कुंडलीक कांगणे, रवी राजू वाघमारे, हसन हाजी शेख, सागर अनंत काटे, सलीम सायधन शेख, इनकर सुंदर कांबळे, रोहित विद्यासागर पुटगे, किरण दादाभाऊ सूर्यवंशी, मंगेश महादेव लोंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर आणि खडकी न्यायालयाच्या आवारात बनावट कागदपत्रांच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिवाजीनगर आणि खडकी न्यायालयात पाळत ठेवली आणि शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून सातजण आणि खडकी न्यायालयाच्या आवारातुन तीन जण अशा दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.