India Corona Update  : गेल्या 24 तासांत 43,893 नवे रुग्ण बाधितांची संख्या 80 लाखांच्या उंबरठ्यावर 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असून नव्यानं वाढ होणार्‍या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील 24 तासांत नव्या बाधित रुग्णांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 43,893 नवे रुग्ण बाधितांची संख्या 80 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या चोवीस तासांत 43 हजार 893 नवे रुग्ण आढळून आले. तर 58 हजार  439 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या 79 लाख 90 हजार 322 वर पोहोचली आहे.

काल दिवसभरात 508 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 1 लाख 20 हजार 010 वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत 15 हजार 054 सक्रिय रुग्णांमध्ये घट झाल्याने देशात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख  10 हजार 803 वर पोहोचली आहे.

देशात सणासुदीचे दिवस सुरू असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल,  कर्नाटक आणि दिल्ली या राज्यात नव्या रुग्णांपैकी 53 टक्के रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, केरळ आणि दिल्ली या राज्यात दररोज चार ते पाच हजारच्या संख्येने वाढ होत आहे.

भारत अजून सर्वाधिक रुग्ण असलेला दुसरा देश आहे. असे असले तरी देशातील कोरोना संसर्गाचा वेग कमी होताना दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.