Corona Vaccination Update : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याला मिळणार 40 लाख लसींचा साठा

एमपीसी न्यूज : राज्याला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात 40 लाख लसींचा नवा साठा मिळणार आहे. तर 18-44 वयोगटासाठी 20 लाख लसींच्या खरेदीचा प्रस्ताव केंद्राकडे अखेरच्या टप्प्यात असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले.

लसीच्या या साठ्यातून दुसरा डोस घेणाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. तसेच 45 हून अधिक वयोगटाला पहिला डोसही देण्यात येईल. राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले की, लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या जिल्ह्यांना प्राधान्य देतानाच सक्रिय रुग्ण, पॉझिटिव्हीटी दर हे मुद्दे समोर ठेवून लसींचे वितरण करण्यात येईल.

केंद्राकडून मिळणारा लसींचा साठा आणि राज्य खरेदी करत असलेला लसींचा साठा याचा समतोल राखून त्यानंतर 18 ते 44 वयोगटातील लसीकरण पूर्ववत सुरू करण्याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले. धारावीची वाटचाल कोरोनामुक्तीच्या मार्गावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धारावीने पुन्हा एकदा कोरोनावर मात केली आहे.

या भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आले असून आता केवळ १९ सक्रिय रुग्ण येथे आहेत. गुरुवारी या विभागात केवळ एका बाधिताची नोंद झाली. त्यामुळे धारावी परिसर कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचे दिसते आहे. दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या जी उत्तर विभागाने धारावी पॅटर्न पुन्हा एकदा राबवला. जास्तीत जास्त लोकांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण व उपचारावर भर देण्यात आला.

मोबाइल चाचणी व्हॅन, फिव्हर क्लिनिक, बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला. याचा प्रभाव आता दिसून येत आहे. गेल्या आठवड्यापासून धारावीत दररोज तीन ते चार बाधित आढळून येत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.