Independence Day : स्वातंत्र्य दिनानिमित्त राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

एमपीसी न्यूज – भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यंदा देशभारत साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून हर घर तिरंगा अभियान संदर्भात जनजागृती करण्यासाठी तसेच तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना (Independence Day) वाढीस लागावी याकरता राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.13) चिंचवड परिसरात प्रभात फेरी काढली.

या कार्यक्रमासाठी राजश्री शाहू महाराज विद्यालयचे सचिव लहू कांबळे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग तसे कीर्ती मारुती जाधव, नितेश शेट्टी, अक्षय ओव्हाळ, संतोष पेहकर, अविनाश काळे, बबन पाहुणे, सुरज आढाव, धनंजय जाधव, सेफ शेख, सागर हुसळे, शुभम काळे आदी उपस्थित होते.

Tomorrow – Together Project लीला पुनावाला फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप

या कार्यक्रमांमध्ये 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. (Independence Day) तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिक सादर केली. पारंपारिक वेशभूषेत ढोल लेझीम पथक लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे आपल्या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली  व भारतीय संस्कृती प्रमाणे सर्वांना झेंडे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.