Independence Day : एकता प्रतिष्ठानकडून डोणे गावात तिरंगा झेंड्याचे वाटप

एमपीसी न्यूज –  पवन मावळातील डोणे येथे एकता प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हर घर तिरंगा अंतर्गत घरोघरी तिरंगा मेहिमेअंतर्गत व स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 कुटुंबांना भारताच्या राष्ट्रध्वजाचे (Independence Day) वाटप करण्यात आले.

यावेळी एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे, अध्यक्ष योगेश कारके उपाध्यक्ष रवींद्र काळभोर, पोलिस पाटील उमेश घारे, कार्याध्यक्ष विशाल कारके, किरण काळभोर, विजय कारके, नागेश कारके, शेखर काळभोर, समिर खिलारे, सागर चांदेकर, तेजस घारे, प्रतिष्ठानचे सभासद व महिला उपस्थित होत्या.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने हर घर तिरंगा अंतर्गत दि.13 ते 15 ऑगस्ट  दिवशी देशातील प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. आपला राष्ट्रध्वज तिरंगा आपला अभिमान अस्मिता आहे. त्यामुळे झेंड्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होवू नये, यासाठी घरोघरी तिरंगा ध्वज वाटप करताना एकता प्रतिष्ठान डोणे या सामाजिक संस्थेच्या वतीने (Independence Day) जनजागृती ही करण्यात आली.

Independence Day : स्वातंत्र्य दिनानिमित्त राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.