India-China Crisis: भारताने सीमावाद आणखी जटिल करु नये- चीन

India-China Crisis: India should not complicate border disputes says China सीमेवर कठीण स्थिती निर्माण होऊ नये, अशी कोणतीही कारवाई भारत करणार नाही.

एमपीसी न्यूज- भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सध्या खूप तणावपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. परंतु, अद्यापही यावर काही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. विशेषतः एलएसीबाबतच्या निर्णयावरही चीनने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने सीमा वाद आणखी जटिल करु नये असा इशारा चीनने दिला आहे. या मुद्द्यावरुन भारत आणि चीन पुन्हा चर्चा करु शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिनी दुतावासाच्या प्रवक्त्याने बुधवारी रात्री उशिरा या मुद्द्यावर टि्वट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीनला आशा आहे की, सीमेवर कठीण स्थिती निर्माण होऊ नये, अशी कोणतीही कारवाई भारत करणार नाही. सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता टिकून राहिल आणि द्विपक्षीय संबंधांबाबत अनुकूल स्थिती तयार होईल.

भारत आणि चीन यांच्यातील तणावाची स्थिती दिर्घकाळ सुरु राहिल, असे वृत्त आल्यानंतर चीनकडून अशाप्रकारचे वक्तव्य समोर आले आहे. चिनी अधिकाऱ्यांनी म्हटले की, दोन्ही देशांचे सैन्य आणि राजनैतिक प्रतिनिधी चर्चेत व्यस्त आहेत. त्याचबरोबर सीमेवरही शांततापूर्ण स्थिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1